‘कल्चर इन स्पेसेस’ फिरते प्रदर्शन आता गोव्यात
पणजी:
आपल्या शतकपूर्तीचा सोहळा साजरा करण्यासाठी भारत फ्लोरिंग्स अॅण्ड टाइल्स (बीएफटी) या ब्रँडने यंदा गोव्यात 11 ते 19 नोव्हेंबर 2022 या दरम्यान पर्वरी येथील जोस्मो स्टुडिओमध्ये एका अत्यंत खास फिरत्या प्रदर्शनाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. स्वदेशी चळवळीच्या संपन्न वारशावर उभ्या असलेल्या या ब्रँडने आयात करण्यात येणाऱ्या टाइल्सच्या तुलनेत अर्ध्या किमतीत स्थानिक पातळीवर बनवलेल्या, टिकाऊ सिमेंटच्या टाइल्स बाजारात आणल्या.
या फिरत्या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असणार आहे ‘कॅबिनेट ऑफ क्युरॉसिटीज’. यात बीएफटीच्या गतकाळातील आणि सध्याच्या अनेक औत्सुक्यपूर्ण आणि संग्रहित वस्तू पाहता येतील. बीएफटीच्या या खजिन्यातील विविध अर्थपूर्ण आणि एक वेगळी कथा सांगणारी प्रत्येक वस्तू पाहण्याचा, त्यांच्याशी जोडले जाण्याचा अद्वितीय अनुभव अभ्यागतांना इथे घेता येईल. बीएफटीच्या ‘कॅबिनेट ऑफ क्युरॉसिटीज’ला शनिवार 12 नोव्हेंबर 2022 पासून सुरुवात होईल.
या प्रदर्शनातील विविध वस्तूंसोबतच बीएफटीने रविवार 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या काळात हेरिटेज वॉकही आयोजित केला आहे. शहरात विविध ठिकाणी या ब्रँडने जुना वारसा जपण्याचा, त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी भेट देण्याची संधी अभ्यागतांना मिळणार आहे. इतकेच नाही, यात टाइल मेकिंग वर्कशॉपही असणार आहे. यात अभ्यागतांना टाइल्स बनवण्याची प्रक्रिया वैयक्तिक पातळीवर समजून घेता येणार आहे.
गोव्यातील कार्यक्रमाला आणखी उंचीवर नेण्यासाठी बीएफटीने एक शिष्टमंडळ चर्चाही आखली आहे. शनिवार, 12 नोव्हेंबर 2000 रोजी सायंकाळी 5.30 ते 7 या दरम्यान बसराइड डिझाइन स्टुडिओचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट आणि सहसंस्थापक अयाझ बसराय या चर्चेचे सूत्रसंचालन करतील. तर, मोझिअॅक डिझाइन कम्बाइनचे भागीदार आणि प्रिन्सिपल आर्किटेक्ट डीन गॅब्रिएल डीक्रूझ, स्टुडिओ मोमो आर्किटेक्चर अॅण्ड डिझाइनच्या आर्किटेक्ट आणि संस्थापक मीतू अकाली आणि गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे संशोधक आणि व्हिजिटिंग प्रोफेसर आर्किटेक्ट फर्नांडो वेल्हो यासारखे आर्किटेक्चर आणि सजावट तज्ज्ञ या चर्चेत सहभागी होतील. गोव्याच्या दृश्य स्वरुपात झालेले बदल, पुरातन स्थळांच्या संवर्धनातील अडथळे अशा विषयांवर यावेळी चर्चा होईल आणि हे तज्ज्ञ आपली मते मांडतील. भारत फ्लोरिंग्स अॅण्ड टाइल्सच्या वारसासंपन्न कंपन्यांनी पारंपरिक स्थापत्यशास्त्र पद्धतींचे आपले ज्ञान आणि हँडीक्राफ्ट्सविषयी जपलेली बांधिलकी यामुळे गोव्याच्या स्थापत्यकलेचे संवर्धन केले आहे. यावरही या चर्चेत भर दिला जाईल.
या प्रदर्शनाची माहिती खालीलप्रमाणे:
• स्थळ :जोस्मो स्टुडिओ,
एफ.सी. गोवा हाऊस. क्र. 850,
ऑफ एनएच-66, पर्वरी, गोवा – 403521
• तारीख: 11 – 19 नोव्हेंबर 2022
• वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10 – सायं. 7