
गोवा
‘ईएसजी’तर्फे इफ्फीनिमित्त आकाशकंदील स्पर्धा
पणजी :
गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे गोवा
सरकारच्या सहकार्याने येत्या ‘इफ्फी’ महोत्सवाचा एक भाग म्हणून
आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील
कोणालाही या स्पर्धेत सहभागाची मुभा असून या स्पर्धेत एकूण
कमाल ६०० प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
प्रत्येक
तालुक्यातून प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर जास्तीत जास्त ५०
प्रवेशिका स्वीकारल्या जातील. प्रत्येक स्पर्धकाला सहभागासाठी
रु. ५०० देण्यात येतील. प्रवेशाची मुदत १८ नोव्हेंबर असून
नोंदणीसाठी नीलाई नाईक यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांना
थर्माकोलचा अपवाद सोडून अन्य कोणतेही साहित्य वापरता येईल.
पूर्ण तयार आकाश कंदील २० रोजी ‘ईएसजी’ कार्यालयात
सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत सादर करावेत. आकाश
कंदील प्रदर्शित करण्यासाठी स्पर्धकांना वीज साहित्य व कनेक्शन
‘ईएसजी’तर्फे देण्यात येईल.


