
सोशल मिडियाच्या माध्यमातून गोव्याची बदनामी केल्यास आता त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पावसाळी अधिवेशानाच्या अकराव्या दिवशी सभागृहात दिली. वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी शून्य कालमध्ये याबाबत प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.