
‘गोव्यात देशातील पहिले ‘ग्रंथालय धोरण’ राबवणार’
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या मुद्यावरुन आक्रमक असतानाचा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. गावडे म्हणाले की, ”कला आणि संस्कृती विभागाने संस्कृती जतनासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी 600 गट आणि संस्थांना आर्थिक पाठबळ दिले.”
गावडे पुढे म्हणाले की, “गोव्याच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यात 78 ग्रंथालये स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रंथालय धोरण अंतिम टप्प्यात आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यास अंतिम रुप मिळेल. हे देशातील पहिले ग्रंथालय धोरण ठरेल. याशिवाय, राज्यभरातील रवींद्र भवनांचे नूतनीकरण केले जाईल.”