Goa Carnival 2024: पणजीत कार्निव्हलची दिमाखदार सुरुवात
Goa Carnival 2024: व्हिवा कार्निव्हल…खा…प्या आणि मजा करा, असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट काल म्हणजेच शुक्रवारपासून सुरु झाली. पर्वरीत संध्याकाळी कर्टन रेझर संपन्न झाल्यावर कार्निव्हलचा पडदा उघडलं.
आज म्हणजेच शनिवारी राजधानी पणजीत दुपारी 3 च्या सुमारास मोठ्या दिमाखात कार्निव्हलला सुरुवात झाली. रंगीबेरंगी आणि आर्कर्षित असे चित्ररथ पाहण्यासाठी पणजीत शनिवारी दुपारपासूनच प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
ही मिरवणूक मुख्य मार्गाने सुरु असल्याने पणजीतील वाहतूक अंतर्गत रस्त्याने वळवण्यात आली होती.
पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळेच शहरात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी काही मार्ग बदलण्यात आले होते. तसेच कार्निव्हलसाठी आलेल्या प्रेक्षकांनी रस्त्याच्या दुतर्फ़ा आपल्या गाड्या पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीसाठी होत असलेले दिसून आले.
बेशिस्त वाहनचालकांसाठी तसेच रहदारी सुरळीत राहावी यासाठी पणजीतील अंतर्गत रस्त्यांवर चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आझाद मैदान, 18 जून रोड या भागात कमालीची वाहतूक कोंडी दिसून आली.