गोवा
लवकरच रो-रो फेरीबोटी गोंयकारांच्या सेवेत
नदीपरिवहन खात्याच्या वतीने जलमार्गावरील वाहतूक सुरळीत करणे आणि सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी करण्यासाठी सहा-सात महिन्यांत रो-रो फेरीबोटींचा सेवेत समावेश करण्यात येणार आहे.
या बोटी बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
खात्याच्या वतीने आज शनिवारी सकाळी नव्याने बांधणी केलेल्या ‘मांडवी’ आणि ‘दूधसागर’ या दोन फेरीबोटींचे मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते पणजी जेटीवर जलावतरण करण्यात आले.