google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

3 तालुक्यातील 3 पंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर…

पणजी:

राज्यातील 3 तालुक्यांतील 3 पंचायतींमधील प्रभागाची पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक 2 जुलैला होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तिसवाडी, पेडणे व सासष्टी तालुक्यातील तीन पंचायतींमधील प्रभागातील जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव्ह पंचायतीमधील प्रभाग 5, पेडणे तालुक्यातील पार्से पंचायतीच्या प्रभाग 7 तर सासष्टी तालुक्यातील धर्मापूर – शिर्ली पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये ही निवडणूक होणार आहे.

पोटनिवडणूक 2 जुलैला होणार असून मतदान सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी 3 जुलैला होणार आहे. 14 जूनपासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. 3 पंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!