पणजी:
केंद्र सरकारने आज राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण रक्कम वितरीत केली. यात गोव्याला 457 कोटी रूपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले आहे. तर महाराष्ट्राला 7,472 कोटी रूपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले.
59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी 1,18,280 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार राज्यांना नियमित मासिक कर हस्तांतरण करण्यात येते.
कोणाली किती रक्कम (कोटी रुपये) :
उत्तर प्रदेश – 21, 218, बिहार – 11, 897, मध्य प्रदेश- 9, 285, पश्चिम बंगाल – 8, 898, महाराष्ट्र- 7, 472, ओडिसा – 5, 356 रूपये कर हस्तांतरण करण्यात आले आहे. तसेच, इतर राज्यांना त्यांचा वाटा देण्यात आला आहे. असे 1,18,280 कोटी रुपये देण्यात आले आहेत.