गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कायतान फर्नांडिस विजयी झाले आहेत. कायतान फर्नांडिस यांनी असोसिएशनचे माजी अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांचे पुत्र साविओ आलेमाव यांचा पराभव केला आहे. कायतान फर्नांडिस यांना (Caitano Fernandez) यांना 83 मते मिळाली आहेत. तर, साविओ आलेमाव (Savio Alemao) यांना 47 मते मिळाली आहे.
गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. यात कायतानो फर्नांडिस विजयी झाले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिसरे उमेदवार असलेले जोस मेनेजिस यांना 29 मते मिळाली आहेत.
चर्चिल आलेमाव यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याने त्वरित अध्यक्षपद सोडावे असे आदेश गोवा खंडपीठाने दिले होते. सप्टेंबर महिन्यात चर्चिल आलेमाव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद खाली होते.
चर्चिल आलेमाव यांनी 16 मे 2019 रोजी वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याने त्यांना त्वरित अध्यक्षपद सोडण्याचा आदेश गोवा खंडपीठाने दिले. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा गोपनीयतेने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार नाही. असेही गोवा खंडपीठाने म्हटले होते. दरम्यान, 08 सप्टेंबर रोजी चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.