सरकारला घेरण्यासाठी विरोधक एकवटले…
गोवा (Goa )विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीती ठरविण्याकरता विरोधक एकत्रित आले आहेत. सरकारला विविध मुद्यांवर घेरण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कार्यालयात सर्व विरोधकांची एकत्र बैठक झाली. बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, एल्टन डिकास्ता, गोवा फॉरवर्डचे (Goa) विजय सरदेसाई, आरजीचे विरेश बोरकर, आपचे व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन १६ ते १९ जानेवारी दरम्यान होत आहे. यासाठी विरोधी पक्षाची भूमिका आणि गोवा (Goa) विधानसभेतील रणनीती ठरविण्याकरता विधानसभेतील सर्व विरोधी आमदारांची बैठक आज विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पार पडली. यावेळी सरकारकडून कमी केलेला अधिवेशनाचा कालखंड, दिवसाआगोदर संपविले जाणारे अधिवेशन, प्रश्नांची माहिती मिळवण्यासाठी घातलेली मर्यादा अशाप्रकारे सरकारकडून सातत्याने केली जाणारी विरोधकांची गळचेपी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.