google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

बालमणी अम्मा यांना गुगलकडून मानवंदना

मल्याळम साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध कवयित्री बालमणी अम्मा यांना आज गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. आज त्यांची 113वी जयंती असून सर्च इंजिन गुगलच्या डूडलवर बालमणी अम्मा दिसत आहेत.

नलपत बालमणी अम्मा या मल्याळम भाषेतील प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांच्या कविता या प्रेरणादायी कविता म्हणून ओळखल्या जातात. बालमणी अम्मा यांची आज 113वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गुगलने खास डूडलच्या माध्यमातून बालमणी यांना आदरांजली वाहिली आहे. हे डुडल आर्टिस्ट देविका रामचंद्रनने बनवले आहे. बालमणी अम्मा या मल्याणम साहित्यातील नावाजलेल्या कवयित्री होत्या.

बालमणी अम्मा यांनी कुदुम्बिनी, धर्ममार्गथिल, श्रीहृदयम्, प्रभांकुरम, भवनायिल, ओंजालिनमेल, कलिककोट्टा, वेलिचथिल अशा महान कविता लिहील्या. त्यासाठी त्यांना सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार आणि एझुथाचन पुरस्काराने सन्मानित केले आहेत. याचबरोबर भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. बालमणी अम्मा यांच्यावर नलपत नारायण मेनन आणि कवि वल्लथोल नारायण मेनन यांच्या कवितांचा प्रभाव होता.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात बालमणी अम्मा यांचा जन्म झाला. कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्या इतक्या लोकप्रिय कवयित्री झाल्या. बालमणी यांचे मामा नलप्पट मेनन स्वत: एक कवि होते. त्यांच्याकडे बरीच पुस्तके होतेी. ज्यातून त्यांना कवि बनण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या 19व्या वर्षी बालमणी यांचे व्ही.एम.नायर यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर सुलोचना, श्याम सुंदर, मोहनदास और प्रसिद्ध लेखिका कमला दास ही चार अपत्ये झाली.

बालमणी अएम्मा यांचे 20 पेक्षा जास्त गद्य रचना आणि अनुवाद प्रकाशित झाले आहेत. मुलं आणि नातवंड यांच्यावर असलेले प्रेम त्यांच्या कवितांतून दिसतं. त्यासाठी त्यांना मल्याळम कवितेतील अम्मा (आई) आणि मुथासी (आजी) ही पदवी मिळाली. 2004 साली बालमणी अम्मा यांचे निधन झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!