टीम इंडियाचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय
भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना पळताभुई थोडी केली. हार्दिक पांड्याने संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेडने श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला. दिपक हुड्डाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
Axar Patel bowls a tight final over and India hold their nerve to win a thriller 👏#INDvSL | Scorecard: https://t.co/hlRYVeKIdx pic.twitter.com/tkIMPAXlEJ
— ICC (@ICC) January 3, 2023
भारतीय संघ पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीने झटपट विकेट्स गमावल्या होत्या. भारताचा अर्धा संघ तंबूत गेला होता. मात्र, भारताच्या तळातील फलंदाजांनी अशी काही खेळी केली की, पाहुण्या संघाला सहावी विकेट मिळालीच नाही. यासह तळातील फलंदाजांच्या जोडीने शानदार भागीदारी रचत खास विक्रमाची नोंद केली.