‘क्रांतीकारकांच्या शौर्याचा इतिहास जपणे हे आपले आद्यकर्तव्य’
सातारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाच्या आवारात राज्यभरातील प्रत्येक जिल्हयातील एक असे सुजन भारत पुस्कार देऊन समाजातील आदर्शाना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संजीवनी लोकसेवा महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास जेजुरीकर होते.
सुजन फाऊंडेशन आदर्की या संस्थेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याची गौरवशाली ७५ वर्षे पूर्तीबद्दल गेले वर्षभर अमृत महोत्सव समितीच्यावतीने अध्यक्ष संपतराव जाधव हे देशभरात विविध राज्यात पोहचले असून स्वातंत्र्यासाठी आपले क्लीदान देणा-या प्रत्येक क्रांतीकारकाच्या भूमीत जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना व वारसांना भेटत त्यांच्याकडून नवीन उर्जा घेत नव्यापिढीला वाटत आहेत.
अशा पैकी राहुल नारायणे संगमनेर, कुमारी शिवानी सोनावने सिन्नर, सी प्रणालीताई सुर्यवंशी पुणे, पत्रकार जयवंत पिसाळ भुईंज, बापूराव सुळ फलटण, दिनकर ताजणे जुन्नर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फैटा गळ्यात तिरंगी हार पंचधातूचे पदक व सन्मानचिन्ह असे होते.
प्रारंभी सुजन फाऊंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजीत जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातून आलेले निमंत्रित व संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने हजर होते.