google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

भारतीय कॉर्पोरेट्सनी विशेष शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतवणूक करावी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून हिंदुजा समूहाने आपली प्रमुख संस्था हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्समार्फत भारताच्या भविष्याला आकार देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सची सुरुवात शरणार्थींच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेले एक सामान्य प्राथमिक विद्यालय म्हणून झाली होती. आज ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स आता एक डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

आज हा समूह हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून ‘रोड टू स्कूल’ आणि ‘रोड टू लाईवलीहूड’ या उपक्रमांमध्ये भारतभर ७,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करत आहे. २०३० सालापर्यंत १ मिलियन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या योजनेसह हिंदुजा फाउंडेशन शिक्षणामध्ये परिवर्तनाचा मुख्य स्रोत बनून सातत्याने प्रोत्साहन देत आहे आणि २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या भारताच्या दृष्टिकोनामध्ये प्रमुख योगदान देत आहे.

या समारोहाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्यासह अनेक इतर मान्यवर देखील उपस्थित होते. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्षणीय शैक्षणिक आणि अभ्यासक्रमबाह्य यशासाठी सन्मानित केले.

हिंदुजा कॉलेजची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभामध्ये विद्यार्थी आणि मान्यवरांना संबोधित करताना, भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, “सनातन हा देशाच्या संस्कृतीचा व शिक्षणाचा भाग असला पाहिजे कारण हे समावेशकतेचे प्रतीक आहे आणि यामध्ये आपली मुळे घट्ट रुजलेली असावीत यावर भर दिला. त्यांनी कॉर्पोरेट इंडियाला आग्रह केला की त्यांनी विशेष संस्था निर्माण करण्यासाठी शिक्षणामध्ये गुंतवणूक करावी. परोपकारी प्रयत्न हे कमॉडिफिकेशन आणि व्यावसायीकरणाच्या सिद्धांतांनी प्रेरित नसावेत. आपल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रणाली याने ग्रस्त आहे. त्यांनी शिक्षण हे सर्वात प्रभावी परिवर्तनकारी तंत्र देखील आहे, जे समानता घडवून आणते.” त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की, हिंदुजा कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यापुरते मर्यादित राहणार नाही तर जागतिक प्रतिष्ठेची संस्था बनेल.

हा टप्पा पार केल्याबद्दल हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले, “संस्था एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी सज्ज आहे, जे उद्योग आणि शिक्षणादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठीची वचनबद्धता मजबूत करेल, त्यासोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी बनण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता अनेक पटींनी वाढवण्याच्या दीर्घकालीन योजना देखील आहेत. हे कॉलेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये नवीन कार्यक्रम सुरु करण्याची योजना तयार करत आहे, त्यासोबतच क्लायमेट फायनान्स आणि निर्यात आयात व्यवस्थापनामध्ये विशेष अभ्यासक्रम देखील सुरु करेल.”

अशोक हिंदुजा यांनी सरकारकडून शिक्षणामध्ये सनातन सिद्धांतांचा समावेश करण्यावर विचार करण्याचा देखील आग्रह केला. या सूचनेशी सहमती दर्शविताना माननीय उपराष्ट्रपती म्हणाले, “सनातन समावेशकतेला प्रोत्साहन देते.”

हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “हिंदुजा कॉलेजमध्ये पुनर्विकास केला जात आहे, अत्याधुनिक पायाभूत संरचना आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली अत्याधुनिक, अनेक मजल्यांची सुविधा तयार केली आहे. आशा आहे की, ही महत्त्वाकांक्षी योजना २०२८ पर्यंत पूर्ण होईल. आम्हाला आशा आहे की, नवीन सुविधा कॉलेजच्या भौतिक क्षमता तीन पटींनी वाढवेल जेणेकरून संधींच्या एका स्पेक्ट्रममध्ये डिजिटल आउटरीच आणि प्रोग्रामिंगच्या क्षमता वाढवल्या जाऊ शकतील.”

हिंदुजा कॉलेजमध्ये ३० पेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम आहेत आणि त्यांना २०२३-२४ मध्ये NAAC A+ मान्यता मिळाली आहे. २०२२ मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आलेल्या या कॉलेजने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सज्ज करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप पावले उचलली आहेत.

कॉलेजचे व्हिजन स्पष्ट आहे: “आमच्या विद्यार्थ्यांना फक्त उत्कृष्टतेसाठी नाही तर इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी सशक्त बनवणे.” विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!