google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

शाहरुखचा ‘जवान’ ब्लॉकबस्टर…

मुंबई :


अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट आज (गुरूवार) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे सकाळचा पहिला शो पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. इतकंच नव्हे तर थिएटरमध्ये चाहत्यांनी धमालसुद्धा केल्याचं पहायला मिळत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातोय. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण सोशल मीडियावर ‘जवान’चं कौतुक करत आहेत. जवान ब्लॉकबस्टर हिट ठरणार असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.



जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतही ‘जवान’विषयी बरीच क्रेझ आहे.


सोशल मीडियावर जवानचं फार कौतुक होत आहे. शाहरुखला मोठ्या पडद्यावर नाचताना पाहून चाहतेसुद्धा थिएटरमध्ये नाचू लागले आहेत. थिएटरमधील प्रेक्षकांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘पहिल्या शोसाठी एवढी गर्दी पाहून हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल’, असं एकाने म्हटलंय. तर ‘शाहरुखने त्याच्या एनर्जी आणि स्वॅगने संपूर्ण शो लुटला आहे. जवान हा प्रत्येक अँगलने चांगला चित्रपट आहे’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं आहे.


निर्माते आणि चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांच्या मते शाहरुखचा ‘जवान’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांचा बिझनेस करू शकतो. सोशल मीडियावरही किंग खानचे चाहते या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. जवान हा चित्रपट ओपनिंगलाच जगभरात शंभर कोटी रुपयांची कमाई करू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी वर्तवला आहे. यामध्ये 40 कोटी रुपये परदेशातून आणि 60 कोटी रुपये भारतातून कमाई होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!