सातारा
‘दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्यावर दरोडा टाकणारा कोण?’
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेळके याचा सवाल
सातारा ( महेश पवार) :
जिल्ह्यातील पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्ह निर्माण झाली असून माण खटाव साठी जिहे कटापुर योजनेतून चारमाही पाण्याची मंजुरी असताना देखील ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत कृष्णा आणि वेण्णा नदीवरील शेतकऱ्यांचे खाजगी कनेक्शन कट करून शेतकऱ्यांना अडचणीत आणून राजरोसपणे शेती व पिण्याच्या पाण्यावर दरोडा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांनी केला आहे.
या पाण्याची पळवापळवी म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निव्वळ स्टंटबाजी, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांचा सम्मान करण्याऐवजी त्याचा अवमान केला जात असल्याचे मत शेळके यांनी व्यक्त केले.
खरतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देण्याऐवजी ते गप्प का असा सवाल शेळके यांनी केला. झालेल्या प्रकाराबद्दल कृष्णा सिंचन विभागाला जाब विचारणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेळके यांनी बोलताना सांगितले.