पणजी :
“द कर्नाटक स्टोरी” 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे कथानक आहे. राजकारणाला नवीन दिशा देणाऱ्या विजयाबद्दल कर्नाटक काँग्रेसचे अभिनंदन. आगामी काळातही काँग्रेस पक्ष अग्रेसर राहील. लोकशाहीला सलाम, भारतीय घटनेला प्रणाम, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात विधानसभा निवणुकीत काँग्रेसच्या प्रचंड विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी भाजपने देशातील “द स्टोरी ऑफ कॉमन मॅन” वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा टोला हाणला आहे.
या देशात सामान्य माणूस त्रस्त आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे प्रत्येक घराचे बजेट कोलमडले आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपसाठी हा धडा आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
काल्पनीक कथानकांवर आधारीत सिनेमा बघण्यापेक्षा जनतेच्या हाल अपेष्टांकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट झाले आहे असे युरी आलेमाव म्हणाले.