‘मुल्ला यांचे शैक्षणिक संकुल बेकादेशीर’
पणजी:
चिंबल येथील इंदिरानगरात अल्पसंख्याक शाळेजवळच भाजपचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विंगचे प्रमुख उरफान मुल्ला यांनी नवीन शिक्षण संकुल उभारल्यामुळे अॅड. अमित पालेकर यांनी मुल्ला यांना फटकारले.
या नवीन संकुलामुळे भविष्यात इंदिरानगर येथील अल्पसंख्याक शाळेला फटका बसणार असल्याचा आरोप अॅड. अमित पालेकर यांनी केला आहे.
चिंबल येथे बांधण्यात आलेली नवीन इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगत पालेकर यांनी शुक्रवारी शिक्षण संचालनालयाला निवेदन देऊन या नवीन संकुलाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली. तसेच परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय बांधकामासाठी ओक्युपेंसी प्रमाणपत्र जारी न करण्याची मागणीही त्यांनी केली.
पालेकर यांनी शिक्षण संचालनालयाला येत्या तीन दिवसांत नवीन इमारतीवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे आणि संचालनालयाने तसे न केल्यास हे प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचे सांगितले आहे.
पालेकर यांनी निदर्शनास आणून दिले की उरफान मुल्ला अल्पसंख्याक शाळेच्या 300 मीटरच्या अंतरावर असलेल्या निवासी इमारतीचे शाळेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे जे कायद्याने प्रतिबंधित आहे.
नवीन शाळा एका मोठ्या मालमत्तेचा भाग असलेल्या भूखंडावर बांधण्यात आली आहे आणि ती टीसीपीच्या नियमांनुसार उप-विभाजित केलेली नाही. कोणतेही बांधकाम क्रियाकलाप सुरू करण्यासाठी रूपांतरण सनद अनिवार्य आहे. मात्र, तेही मुल्ला यांनी केलेले नाही. टीसीपीच्या कायद्याचे उल्लंघन करूनही मुल्ला यांच्या इमारतीला शिक्षण संचालनालयाने मात्र ना हरकत दाखला प्रदान केला आहे, अशी माहिती पालेकर यांनी येथील पत्रकारांना दिली.
भाजप अल्पसंख्याक विभागचे प्रमुख या नात्याने मुल्ला यांची जबाबदारी अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे आहे. मुल्ला मात्र त्यांच्यापेक्षा अधिक स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करत आहेत. व्यावसायिक दृष्टीने बांधण्यात आलेली नवीन शिक्षण संकुल अल्पसंख्यकांवर अन्याय आहे, असे पालेकर म्हणाले.