कास पठारावरील अतिक्रमणाच्या कारवाईत येतोय भ्रष्टाचाराचा वास !
सातारा (महेश पवार) :
सातारा कास पठाराला वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळाल्याने कास पठारावरील जवळपास च्या जमिनींना महत्व आलं , यांचाच आधार घेत जिल्हा पर जिल्ह्यातील धनिकांचा या जमिनीवर डोळा पडल्यानं , कास पठाराला नजरच लागली.
याठिकाणी असणार्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल भावात घेऊन याठिकाणी कोणी झाडं तोडून तर कोणी उत्खनन करून नियामांचे उल्लंघन करत सर्रास बेकायदेशीर हॉटेल्स उभारली गेली आणि जात आहेत , याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आणि करताना चे दिसत आहे . यामुळे कास पठाराला मिळालेला दर्जा वाढत्या अतिक्रमणामुळे जातो की काय अशी परिस्थिती असताना देखील प्रशासकीय अधिकारी फक्त नावालाच आणि तोंड बघून कारवाई करतात की काय अशी परिस्थिती आहे.
जर बेकायदेशीर हॉटेल्स फार्म आहेत तर त्यांवर हथोडा का पडत नाही यामुळे कुठेतरी कास पठारावरील कारवाईतून भ्रष्टाचाराचा वास येतोय अशी चर्चा सुरू आहे . यामुळे प्रशासनाने कास पठार आणि त्याचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा मारणं गरजेचे आहे .