‘कास’चे पठार एक अन् उद्घाटने दोन…
सातारा (महेश पवार):
सातारा जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या वर्ल्ड हेरिटेज कास पठारावरील फुलांचा हंगामाचे जिल्हा प्रशासनाने चक्क दोनवेळा उद्घाटन केलं रविवारी सकाळी सकाळी खासदार उदयनराजे आणि सायंकाळी शिवेंद्रराजेंनी अशी वेगवेगळी उद्घाटने केल्याने , पर्यटक आणि स्थानिकांच्या मधून अनेक तर्कवितर्क काढले गेले.
कास पठार एक अन् उद्घाटने दोन झाल्यानं जिल्हा प्रशासनाला पण दोन्ही राज्यांच्या मनमानी पुढे झुकावं लागल्याचं या निमित्ताने समोर आले.
नुकत्याच जिल्हा प्रशासनाच्या वनविभागात रुजू झालेल्या उपवनसंरक्षक भारद्वाज यांना यांची प्रचीती आली. पण दोन्ही राजेंनी नेमकं का वेगवेगळे उद्घाटन केलं हे मात्र समजू शकले नाही.