
केरळचे राज्यपाल करणार ‘हृदयकेट्टू अळीनजापोळ’चे प्रकाशन
“काळीज उसवलां” या उदय नरसिंह म्हांबरे यांनी लिहिलेल्या मुळ कोंकणी पुस्तकाचा मल्ल्याळम अनुवाद केरळचे लेखक बाळकृष्ण मल्ल्या यांनी केला आहे. ह्या पुस्तकाला 2023 वर्षासाठी कोंकणी भाशा मंडळ ‘रमेश वेळुस्कार पुरस्कार’ लाभला आहे. “हृदयकेट्टू अळीनजापोळ” ह्या नांवाने केलेल्या ह्या अनुवादाच्या पुस्तकाचे प्रकाशन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. हा कार्यक्रम एर्नाकुलम येथिल एस. एन. व्हि. सदनमच्या सभागृहात होणार आहे.
केरळ ज्योती पुरस्कार विजेते प्रसिद्ध मल्ल्याळम साहित्यीक आनी समिक्षक प्रा. एम. के. सानू यांना या पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांच्या हस्ते भेट देण्यात येईल. तसेच अनुवादक बाळकृष्ण मल्ल्या यांना यासमयी गौरविण्यात येणार आहे. महाराजा कॉलेजचे इतिहासाचे प्राध्यापक विनोदकुमार कल्लोळीक्कल या समारंभाला प्रमुख अतिथी असतील. सुरुवातीला प्रबोधा पब्लिकेशन्सचे सचिव. डी. डी. नवीनकुमार स्वागत करतणार असून कोचिनांत कोंकणीची सेवा करणारे पि. जी. कामत फावंडेशनचे विश्वस्त आनंद कामत पुस्तकाचेर भाष्य करतील.
या कोंकणी पुस्तकाचा मल्ल्याळम भाषेतील अनुवाद कोचिनच्या प्रबोधा ट्रस्टच्या मालकिच्या प्रबोधा पब्लिकेशन्स ह्या संस्थेने प्रकाशित केला आहे. “प्रबोधा ट्रस्ट” हि संस्था कोचिन शहरात समाज प्रबोधन आणि संस्कारक्षम कार्यक्रमांचे आयोजन व प्रकाशन करते.