
अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व..!
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जेडी वेंस यांनीही उप राष्ट्राध्यक्ष पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
शपथविधी समारंभानंतर, नॅशनल स्टॅच्युअरी हॉलमध्ये एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी २०० पाहुणे उपस्थित असणार आहेत. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली.
अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व राखू. जग आपला वापर करू शकणार नाही. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आम्ही आमच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचबरोबर मेक्सकोच्या दक्षिण सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्य पाठवण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.