केएफसीने उन्हाळ्यासाठी आणले ‘हे’ खास पेय…
देशभरात तापमानात मोठी वाढ होत असतांना, या उन्हाळ्यापासून कशी मुक्ती मिळवायची हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. केएफसी इंडिया ने आता यावर एक उत्तम उपाय शोधला आहे. चार ताजीतवानी करणारी पेये आणली असून यामुळे तुम्हाला उन्हापासून मुक्ती मिळू शकेल. थंडगार अशी ही पेये असून ती या उन्हाळ्यात नक्कीच घेतली पाहिजेत.
क्लासिक अशा क्रश लाईम हे थंडावा देणारे पेय असून यामध्ये लिंबाच्या स्वादाबरोबरच भारतीय मसाल्यांचे योग्य मिश्रण करण्यात आले आहे.
ग्राहकांना आता पुदिन्याच्या स्वादाचाही आनंद हा व्हर्जित मोईतो मुळे घेता येणार असून यांत लिंबाबरोबरच पुदिन्याचा वापर हा थंडगार सोड्या मध्ये करण्यात आला आहे.
मेनूतील आणखी एक पेय म्हणजे मसाला पेप्सी यामध्ये तिखटपणा सह कल्ट क्लासिकपणा निर्माण करण्यात आला असून अंतिम पेय म्हणजे माऊंटेन ड्यू मोईतो असून यामध्ये लिंबू आणि पुदिन्यासह माऊंटन ड्यूचाही स्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
रु ५९ पासून पुढील किंमतीत सुरु होणारी ही केएफसीची पेये आता उन्हाळ्यापासून मुक्ती देणारा आणखी एक अनोखा पर्याय ठरला आहे.
तर मग वाट कसली पाहता, जवळच्या केएफसी रेस्तरॉ मध्ये जाऊन किंवा डाईन इन आणि टेक अवे च्या माध्यमातून सर्व चार शितपेयांचा आनंद घ्या.