सातारा
कोरेगाव निवडणुकीचे वातावरण तापले
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वातावरण चांगलं तापलं आहे. आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी क्षेत्र माऊली या ठिकाणी प्रचारासाठी निघाले असताना गावातील युवकाने, ‘तुम्ही आमच्या गावात काय काम केले?’ अशी विचारणा केली. त्यावर महेश शिंदे यांच्या भगिनीने थेट युवकाला कानाखाली लगावण्याचा प्रयत्न केला.
यामुळे परिसरात चांगलंच वातावरण तापलं त्याचं चित्र समोर येते. आता या राहिलेल्या दोन दिवसात कोरेगाव तालुक्यातील होऊ घातलेल्या निवडणुकीत गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त लावण्याची गरज असल्याची मागणी आता जनमानसातून होऊ लागली आहे.
https://youtube.com/watch?v=jA1Thib2pEc&si=EnSIkaIECMiOmarE