सातारा
वेण्णा लेक परिसरात पारा पाच अंशावर…
सातारा (महेश पवार) :
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मधील तापमानामध्ये घसरण झाली असून वेण्णा लेक परिसरात पाच अंशावर पारा आला आहे, यामुळे वेण्णा लेक परिसरातील बोटींग ट्रॅक वर दंव बिंदू गोठून बर्फाचा थर तयार झाल्याचं दिसते , यामुळे परिसरात थंडीचे देखील प्रमाण वाढले आहे ,याचं गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक महाबळेश्वरला येत आहेत.