सातारा
‘अन्यायकारक कर आकारणी रद्द करा, अन्यथा नगरपालिकेसमोर करणार आत्मदहन’
मेढा (महेश पवार) :
मेढा नगरपंचायतीच्या वतीने आकारण्यात आलेली चतुर्थ मिळकत कर आकारणी ही अन्यायकारक व अवाजवी असून पुन्हा स्थलदर्शक पाहणी करून ही आकारणी करावी. अन्यायकारक कर आकारणी कमी करून नगरपंचायतीची बॉडी अस्तीत्वात येत नाही तोपर्यंत जुन्या दरानेच म्हणजे जून २०२३ मध्ये वाटण्यात आलेल्या कर मागणी बिलाप्रमाणेच आकारणी करावी या मागणीसाठी आज मेढा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नगरपंचायतीवर नागरिकांनी मोर्चा काढून निवेदन दिले.
यावेळी बोलताना सुरेश पार्टे यांनी मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या मनमानी कारभारावर सडकून टीका केली. मेढा शहरात वाढीव कर आकारणीचा विषय ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटला असून ही कर आकारणी रद्द करावी व जुन्या दरानेच कर आकारणी करावी यासाठी नागरिक आक्रमक झालेले पहायला मिळाले.
या कर आकारणीच्या विरोधात सुरेश पार्टे यांनी आत्मदहन करावे लागेल असा इशारा दिला. व नागरिकांच्या वतीने वाढीव कर आकारणी विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते यावर मुख्याधिकारी कोडगुले यांनी कर आकारणी बाबत गैरसमज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला होता यावर सुरेश पार्टे यांनी मुख्याधिकारी कोडगुले यांच्यावर सडकून टीका केली व असे आमच्यावर शंभर गुन्हे दाखल करा आम्ही तयार आहोत असा इशारा प्रशासनाला दिला.
आज करवाढीच्या निषेधार्थ मेढा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी एक वाजता भैरवनाथ मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली नगरपंचायतीत मोर्चा आल्यानंतर नागरिकांनी नगरपंचायतीने केलेली करवाढ कशी अन्यायकारक आहे याबाबत आपली मते व्यक्त केली तसेच नागरिकांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सपोनि संतोष तासगावकर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
या मोर्चात सुरेश पार्टे, संतोष वारागडे.एस एस पार्टे,संजय सपकाळ,प्रकाश कदम,मधुकर शेलार, अरविंद जवळ,सचिन जवळ,सागर इगावे,किसन कदम,आनंद दळवी,हनुमंत धनावडे,तुकाराम धनावडे,सुधाकर मोरे,सत्यवान सनस,आनंदा कांबळे,दिनकर देशमुख,सखाराम शिंदे आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या खुलाश्यात राजकीय भाषा शोभत नाही त्यांना सत्तेच्या खुर्चीची एवढी मस्ती आली असेल तर आम्ही पण शंभर गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत असे सुरेश पार्टे यांनी सांगितले. प्रशासक म्हणून एकटे मुख्याधिकारी निर्णय घेवून जनतेला आर्थिक वेठीस धरत असतील तर तो अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा सुरेश पार्टेनी दिला.
…
https://youtu.be/Re58FGrjq3c?si=12bS701CK37LXB-E