
देश/जग
चित्रपटामुळे मिळाली महात्मा गांधींना जगभरात ओळख : नरेंद्र मोदी
महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुहूतूल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पुढे बोलताना, “जगभरात जर मार्टीन ल्यूथर किंग आणि नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधीच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे.” असेही ते म्हणाले.