लवकरच नागराज घेऊन येतोय ‘खाशाबा’
nagraj manjule : सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एक बायोपिक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या ते तयारीमध्ये आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे.
‘टीव्ही ९’च्या वृत्तानुसार, नागराज (nagraj manjule ) यांनी कोल्हापूरच्या शिरोळ भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नागराज म्हणाले, “खाशाबा जाधव हे जागतिक दर्जाचे कुस्तीपटू होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची माझी योजना आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तयारी करून ही घोषणा करता येईल अशी मला आशा आहे.”
“खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. याबाबत लवकरच मी तुम्हावा कळवेन. या चित्रपटाचं चित्रीकरण कुठे करता येईल हा नंतरचा भाग आहे. पण जर याच भागामध्ये शूट केलं तर अधिक आनंद होईल.” खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पदकानंतर खाशाबांचे कौतुक झाले.