google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

रणबीर आणि श्रद्धा म्हणताहेत ‘तेरे प्यार में…’

रणबीर आणि श्रद्धा अभिनीत ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. तसेच, या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अशातच, निर्मात्यांनी आता या सिनेमातील ‘तेरे प्यार में’या मच-इन-डिमांड गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याचा हा टीजर एक ट्रीट असून, यातील गाण्याची झलक पाहून दर्शकांचा उत्साह वाढत आहे. ‘तेरे प्यार में’हे गाणे १ फेब्रुवारीला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.


गाण्याचा हा टीझर प्रेम आणि जीवंतपणाचा परिपूर्ण मिलाफ असल्यासारखा वाटतो. ज्या तरुणांनी या चित्रपटाचा ट्रेलर आधीच पाहिला आहे आणि प्रेमाच्या या नवीन रूपाबद्दल उत्सुक आहेत अशा तरुणांना हा टीझर आकर्षित करेल. तसेच, टीझरमधील रणबीर आणि श्रद्धा यांची फ्रेश जोडी, वाइब्रेंट लुक आणि केमिस्ट्री यांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे.

मागील आठवड्यात ‘तू झूठी मैं मक्कार’या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. तसेच, रणबीर, अरिजीत, प्रीतम, अमिताभच्या चाहत्यांनी या गाण्याबाबत सोशल मीडियावर आपली उत्सुकता व्यक्त केली. चाहत्यांचे हे प्रेम आणि उत्साह पाहून मेकर्सने गाण्याचे लॉन्च प्रीपोन करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे चाहत्यांची अपेक्षा आणि उत्साहात अनेक पटींनी भर पडली आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!