महाराष्ट्र

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन

पुणे:

ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज (२२ जुलै) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. ‘अंताजीची बऱखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे.

नंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ओळख आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: