google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘कशी’ मारली लडाखमध्ये काँग्रेस- नॅशनल कॉन्फरन्सने बाजी?

लडाख : 

जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात पहिल्यांदाच निवडणूक पार पडल्या. केंद्रशासित करण्यात आलेल्या लडाख स्वायत्त परिषदेच्या निवडणुकीचा (Ladakh Autonomous Hill Development Council, Kargil) निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा विजय झाला आहे.

लडाख स्वायत्त परिषदेच्या 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मतमोजणी करण्यात आली. 22 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून उर्वरित जागांसाठी  अजूनही मतमोजणी सुरू आहे. निकाल जाहीर झालेल्या 22 जागांपैकी 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, नॅशनल कॉन्फरन्सने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपने 2 जागांवर विजय मिळवला. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. तर, मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांची निवड उपराज्यपाल करणार आहेत.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. मात्र, अनेक ठिकाणी त्यांच्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या.  भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी त्यांनी काही जागांवर आघाडीचा उमेदवार जाहीर केला.

गेल्या निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली होती आणि नंतर दोन पीडीपी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने त्यांची संख्या तीन झाली. मात्र, यावेळी भाजपने एकूण 17 उमेदवार उभे केले होते. आम आदमी पक्षाने (आप) चार जागांवर नशीब आजमावले, तर 25 अपक्षही रिंगणात होते.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, कारगिलमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना विजय मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले. तर, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुला यांनीदेखील मतदारांचे आभार मानले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!