नेपाळमध्ये भीषण विमान अपघात
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे. सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीचे हे विमान पोखराच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर अपघातग्रस्त झाले, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
येती एअरलाईन्स एअरक्राफ्टचे (Yeti airlines aircraft) प्रवक्ते सुदर्शन बार्तोला यांनी सांगितले की, या विमानत ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. काठमांडू वरुन पोखरा येथे हे विमान आले होते. मात्र जुन्या विमातळावर दुर्दैवाने अपघात झाला. याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. आज तक या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाचा अपघात झाला असावा. डोंगराला धडक दिल्यानंतर विमान समोर असलेल्या नदी किनारी आदळले. तिथेच या विमानाचा अपघात झाला. अपघातस्थळी बराच वेळ फक्त धुराचे लोळ दिसत होते.