google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’

नवी दिल्ली :

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली.

जगभरात मंकीपॉक्स विषाणूच्या झपाट्यानं पसरणाऱ्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरात मंकीपॉक्सच्या 14,000 रुग्णसंख्येची पुष्टी केली आहे. तर आफ्रिकेत मंकीपॉक्समुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर केलेली सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!