
Operation Sindoor: मध्यरात्री 1.30 वाजता भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक
Operation Sindoor India Air Strike in Pakistan LIVE News in Marathi: भारतीय सैन्यदलानं पहलगाम हल्ल्याचं सडोतोड उत्तर देण्यासाठी म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात निर्धारित लक्ष्यभेद करत भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहिम फत्ते केली आणि या हल्ल्यानंतर सीमाभागातील तणावात आणखी वाढ झाली.
हा लष्कर आणि हवाई दलाचा संयुक्त ऑपरेशन असा संयुक्त हल्ला होता ज्यामध्ये 70% पेक्षा जास्त लक्ष्यांवर लष्कराने आणि सुमारे 30% लक्ष्यांवर हवाई दलाने हल्ला केला. भारतीय हवाई दलाने स्टँड-ऑफ शस्त्रे वापरली. लष्कराने इतर योग्य शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त ड्रोन आणि अचूक दारूगोळा वापरला. दोन्ही सेवांनी उत्कृष्टपणे समन्वयित आणि अंमलात आणलेलं असं हे संयुक्त ऑपरेशन होतं.
कुपवाडा आणि राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सैनिकांचे नुकसान झाले आहे. दोन्ही भागात जोरदार तोफगोळ्यांची देवाणघेवाण सुरू आहे. पाकिस्तानच्या अकारण गोळीबार आणि तोफगोळ्यांचा जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय हवाई दलाने श्रीनगर विमानतळाचा ताबा घेतला आहे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व नागरी उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत.