google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

Lok Sabha Election 2024 Date : १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा मतदान

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजले असून, १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. या माहितीत त्यांनी नवमतदार किती आहेत? वृद्ध मतदार किती आहेत? तरुण मतदार किती आहेत? महिला आणि पुरुष मतदार किती आहेत? याची सविस्तर माहिती दिली.

५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.  निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी राज्यं जोडली जाणार.

२ लाख मतदार भारतात असे आहेत ज्यांचं वय १०० हून जास्त आहेत. आमच्याकडे असलेल्या यादीत १८ हजार तृतीय पंथीय आहेत. अशीही माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक जेव्हा मतदानासाठी येतील तेव्हा तिथे व्हिल चेअरची आणि अटेंडंटची व्यवस्था असेल. आम्ही अशा नागरिकांची मतं घरी जाऊनही घ्यायला तयार आहोत. मात्र जर या नागरिकांना मतदान केंद्रावर यायचं असेल तर त्यासाठीही आम्ही तयारी केली आहे.

भारतात यावर्षी ९७ कोटी मतदार आहेत. सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहोत. मागच्या वर्षभरात ११ निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुका राज्यांच्या होत्या. त्या शांततेत पार पडल्या याचं आम्हाला समाधान आहे. आता लोकसभा निवडणूकही तशीच पार पडावी हा आमचा प्रयत्न आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!