
आउटस्टँडिंग केंब्रिज लर्नर अवॉर्ड्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
दि इंटरनॅशनल एज्युकेशन ग्रुप ॲट केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस ॲन्ड ॲसेसमेंट (केंब्रिज) तर्फे भारतातील आउटस्टँडिंग केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी नोव्हेंबर २०२३, मार्च २०२४ आणि जून २०२४ या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या वर्षी केंब्रिजच्या आयजीसीएसई, इंटरनॅशनल एएस आणि ए-लेव्हल परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य दाखवलेल्या भारतातील २२८ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ८२ विद्यार्थ्यांना ‘टॉप इन द वर्ल्ड’ पुरस्कार, तर ११० विद्यार्थ्यांना ‘टॉप इन इंडिया’ पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांनी गणित विषयात सर्वाधिक गुण मिळवत आघाडी घेतली, त्याखालोखाल इंग्रजी विषयातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या वर्षी ‘टॉप इन द वर्ल्ड’ पुरस्कार विजेत्यांपैकी ८८% विद्यार्थी गणित आणि इंग्रजी विषयातील होते, तर केवळ गणित विषयातच ८८% विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले. आउटस्टँडिंग केंब्रिज लर्नर अवॉर्ड्स हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे, जो ४० देशांतील केंब्रिज इंटरनॅशनल एज्युकेशनच्या परीक्षांमध्ये उत्कृष्टता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो.