google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

राष्ट्रपतींच्या पत्रावरून ‘इंडिया’ नाव काढून टाकले?

नवी दिल्ली:

देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढवणार असल्याचं विरोधकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून इंडिया नावाला विरोध करण्यात येत आहे. एवढंच नव्हे, तर संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया नाव हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता चक्क देशाच्या राष्ट्रपतींच्या लेटरहेडवरूनच इंडिया नाव गायब झाल्याचं एका व्हायरल पत्रावरून दिसत आहे.


देशाच्या राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘President of India’ अशाच नावाने आजतागायत संबोधण्यात येत आहे. मात्र, जी२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रामधून इंडिया शब्दच गायब करण्यात आला आहे. इंडियाच्या जागी ‘President of Bharat’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांकडून तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात येत आहे.


या प्रकारावर काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत असून मनीष तिवारी यांनी थेट राज्यघटनेचा संदर्भ दिला आहे. “घटनेच्या कलम ५२ नुसार Constitution of India असा उल्लेख आहे. भारतात President of India असू शकतात. यापेक्षा अजून कुठला पुरावा आवश्यक आहे?” असं ट्वीट मनीष तिवारी यांनी केलं आहे.


“मला कळत नाहीये की यात चुकीचं काय आहे? आपला देश भारतच आहे. मग President Of Bharat म्हणण्यात अडचण कुणाला आहे? काँग्रेसला सगळ्यातच समस्या दिसते. आपण भारत नाही म्हणणार तर काय म्हणणार?” असा थेट सवाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!