‘मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही
कराड आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसापासून काॅंग्रेसच्या ध्येय धोरणांवर तसेच अध्यक्ष पदावरून जोरदार पक्षावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आ. चव्हाण हे काॅंग्रेस सोडणार असल्याचे बोलले जात होते. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात होते. यावर आज कराड येथील पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेवेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. कोविडमुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळे होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी. पक्ष लोकशाही पद्धतीने चालयचा असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी.
राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत काही चुकीच्या पध्दतीने भाजपाला काॅंग्रेसची मते गेली. ती 7 मते कोणाची गेली, यांची चाैकशी व्हावी. याबाबत मी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मागणी केली होती. आता चाैकशी झाली आहे, त्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल.