‘पृथ्वीराज बाबांबाबतची ती पोस्ट खोडसाळपणाची…’
कराड (अभयकुमार देशमुख) :
सोशल मीडिया वरील चुकीच्या बातमीची कोणतीही सत्यता न तपासता फक्त आपले दर्शक वाढून आपल्या पोर्टल चा फायदा व्हावा या प्रसिद्धीच्या हेतूने एका पत्रकाराने लावलेल्या या चुकीच्या बातमीचा व त्या पार्टल चा मी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करतो असेही यावेळी मनोहर शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले कि, मुळात 4 ऑगस्ट च्या कार्यक्रमानंतर काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यक्रम पृथ्वीराज बाबांनी पुढाकार घेऊन केलेले आहेत. यामध्ये जिल्ह्यात काढण्यात आलेली तिरंगा यात्रा ही यात्रा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाकडून देशभर काढण्यात आली होती व यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 कि. मी. यात्रा आयोजित केली होती. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पृथ्वीराज बाबा स्वतः हजर राहीले होते तसेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्यांचा इतिहास सगळ्यांना जाहिर कार्यक्रमातून सुद्धा ते सांगत होते या रॅलीनंतर काँग्रेस पक्षाने दिल्ली येथे आयोजित केलेली महागाई च्या विरोधातील रॅली मध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सोबत सहभागी झाले होते. व्यासपीठावर सर्व नेत्यांच्या सोबत ते उपस्थितही होते. आणि आता सुद्धा भारत जोडो यात्रा जी निघाली आहे ती यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात येईल त्यावेळी बाबा स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहेत.
मध्यंतरीच्या काळात पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस पक्षाबद्दल जी भूमिका मांडली होती ती पक्षाच्या वाढीसाठी धोरणात्मक अशी भूमिका होती त्याचा काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठिनी विचार करून त्याप्रमाणे पक्षांमध्ये निवडणूक कार्यक्रम सुद्धा आखला आहे. पृथ्वीराज बाबांचा राहुल गांधींना कधीच विरोध नव्हता अशी अनेक उदाहरणे सत्ता असताना सुद्धा घडली आहेत जिथे बाबांनी राहुल गांधींना पुढाकार घ्यायला सांगितले होते परंतु चुकीच्या बातम्या पसरवून बाबांच्या भूमिकेचा अपप्रचार चालवीला जात आहे.
त्यामुळे कराड मध्ये सोशल मीडिया वरून जे काही जुने फोटो लावून कोणतीही तथ्यता न तपासता व्हायरल मेसेज पाठविले जात आहेत व बातम्या केल्या जात आहेत त्याचे पूर्णपणे खंडन काँग्रेस पक्षाचा एक तालुकाध्यक्ष म्हणून मनोहर शिंदे यांनी यावेळी केले.