नुकतेच गोव्यातील पणजी शहरात 6 ते 8 जानेवारी दरम्यान पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लाइव्ह परफॉर्मन्स, भव्य प्रदर्शन, क्रीडा इव्हेंट्स,असे बरेच उपक्रम होते. वैविध्यतेचा सोहळा ठरलेल्या ‘पर्पल फेस्ट’ हा महोत्सव विविध कार्यशाळा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्मरणीय ठरला होता. दरम्यान या सोहळ्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये केलेय.
‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधतात. याच कार्यक्रमात मोदी म्हणाले, “पणजी ‘येथे 6 ते 8 जानेवारी दरम्यान पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते; या सोहळ्यात 50,000 हून अधिक लोक सहभागी झाले होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा एक अनोखा प्रयत्न केला गेला होता” अशा शब्दात त्यांनी कौतुक केलंय.
गोवा राज्य अपंग आयोग, समाजकल्याण आणि मनोरंजन सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा ‘द पर्पल फेस्ट’ कायर्क्रम करण्यात आला होता. “समाज विकलांग व्यक्तीला सहजपणे स्वीकारू लागला आहे. या व्यक्तींनाही सन्मान आणि संधी मिळत आहेत. या बदललेल्या चित्राचे ‘पर्पल फेस्ट’ हे एक ठळक उदाहरण आहे” अशा शब्दात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील गौरवोद्गार काढले होते.