‘दुसऱ्या स्वांतत्र्य लढ्यासाठी एकसंघ लढा उभारुया’
वडूज (प्रतिनिधी) :
अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी , महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातत्र्य लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस रणजीतसिंह देशमुख यांनी केले.
वडूज येथील फिनीक्स ऑर्गनायझेशन सभागृहात कॉग्रेस पक्षाच्यावतीने पत्रकाराशी संवाद साधताना देशमुख बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते राजूभाई मुलाणी , तालुकाध्यक्ष डॉ.संतोष गोडसे, डॉ.महेश गुरव,सत्यवान कमाने ,पांडूरंग खाडे , आनंदा साठे , राहुल सजगणे , इम्रान बागवान आदिची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देशमुख पुढे म्हणाले , खटाव तालुका हा क्रांतीकारकाचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजप ची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी कॉग्रेसचे विचार गावा गावात पोहचवणार . हातसे हात जोडो अभियानाच्या माध्यमातून गाव तेथे शाखा उभारून कॉग्रस विचारसरणीची पाळेमुळे घट्ट करणार आहे. दरम्यान काँग्रेस नेते खा . राहुल गांधी यांनी जम्मू – काश्मीरच्या लाल चौकातील भारत जोडो च्या अभियान सांगता सभेतील इती वृत्तांत सांगताना ते म्हणाले की , आंतकवाद्यांची ना दहशत ना सुरक्षा यंत्रणेचा प्रभाव बाजूला करीत खा . राहुल गांधीनी सामान्य जनतेमध्ये मिसळून जन भावना समजावून घेतल्या. या भारत जोडो यात्रेतील सभेमुळे भाजपच्या मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे.
यावेळी तालुकाघ्यक्ष डॉ. संतोष गोडसे म्हणाले की , तालुक्यातील विविध ज्वलंन्त प्रश्नांवर यापुढे सर्वांना सोबत घेऊन विविध पद्धतीने लवकरच जनआंदालने कॉंग्रेसच्या माध्यमातून उभारणार. कॉग्रेस चे माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले की खटाव – माण तालुक्यातील झळकणारे कोटींची उड्डाने घेणारे प्लेक्स बोर्ड यापूर्वीच अनेकांनी पाहिली आहेत . ग्रामपंचायत सदस्यानी ही मंजूर केलेली कामेही या चमकोगिरी भाजपच्या आमदारांनी प्लेक्स बोर्डवर आणून त्यांचे ही श्रेय लाटले आहे . यापुढील काळात नौटंकी करणाऱ्या आमदाराची डाळ येथील जनता शिजू देणार नाही यासाठी आम्ही सतर्कतेचा लढा उभारत आहोत. याप्रसंगी सत्यवान कमाने यांनी प्रास्तावीक केले . तर सुत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले.आभार जिल्हा घ्यश अमरजीत कांबळे यांनी मानले.
याप्रसंगी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराम बागल,आकाराम खाडे,परेश जाधव ,राजेंद्र माने , निलेश घार्गे , सयाजी सुर्वे आदीसह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.