google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

सनबर्नविरोधात गुन्हा नोंदवा, दक्षिण गोव्यावर भाजपची वक्रदृष्टी : ​​युरी आलेमाव

सनबर्न फेस्टिव्हलच्या अधिकृत व्हेरिफाईड एक्स हँडलवर प्री-सेल तिकिटांसाठी नोंदणी करण्याचे जाहिर आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा सरकारच्या मान्यतेशिवाय जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे धाडस करतील की तेच या मॅच फिक्सिंगचा भाग आहेत? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची आता दक्षिण गोव्यावर वक्रदृष्टी पडली आहे. २०२४ मध्ये दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊन लोकसभा पराभवाचा बदला घेण्याचा हा भाजपचा डाव आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

Register Fir Against Sunburn, Bjp's Evil Eye On South Goa : Yuri Alemao

भाजप सरकारचे सनबर्न आयोजकांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच दक्षिण गोव्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सनबर्न फेस्टिव्हलने दिलेल्या जाहिरातीवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

सनबर्नसारख्या उपक्रमांना चालना देऊन भाजपने गोव्याची संस्कृती आणि वारसा संपवला आहे. अशा फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू झालेले आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु सरकारने नेहमीच तथ्य लपवले आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

सनबर्नला गोव्यात कुठेही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये. आम्ही दक्षिण गोव्यात नक्कीच मान्यता देणार नाही आणि उत्तर गोव्यातही आम्ही प्रखर विरोध करू. या फेस्टिव्हमुळे गोव्याचे पुरेसे नुकसान झाले आहे आणि आता तो कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!