ऋषी सुनक करणार इंग्रजांवर राज्य ?
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हेही दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचले आहेत. यासोबतच सुनक यांनी पंतप्रधानपदासाठी आपला जोरदार दावाही मांडला आहे. पण तरीही कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमध्ये मतदानाचे पाच टप्पे आणखी बाकी आहेत तर येत्या गुरुवारपर्यंत हा टप्पा पूर्ण होणार आहे.
तोपर्यंत या पदाच्या दाव्यासाठी दोनच दावेदार आता उरले आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे खूप घाईचे ठरू शकते. असो, या शर्यतीत त्यांना वाणिज्य मंत्री पेनी मॉर्डुअंट यांच्याकडून कडवी स्पर्धा असणार आहे.
पहिल्या फेरीत देखील ऋषी सुनक हे आघाडीवर होते. सुनक यांना 88 मते मिळाली होती. पेनी मॉर्डंट 67 मतांसह दुसऱ्या स्थानावरती होते. दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक हे 101 मतांनी आघाडीवर राहिले आहेत. त्याच वेळी, मॉर्डोंट देखील 83 मतांसह दुसऱ्या क्रमांकावरती आहे.
दरम्यान, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 876 सदस्यांमध्ये तीन दिवसांपूर्वी ‘YouGov’ने केलेल्या सर्वेक्षणात पेनी मॉर्डंट पुढे असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार, मॉर्डंटला 27 टक्के सदस्यांचा पाठिंबा देखील आहे. कामी बेडिनोक 15 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ऋषी सुनक आणि लिट ट्रस 13 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावरती आहेत.