का आणि कोणी लगावली कंगना राणावतला कानशिलात ?
अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. यानंतर कंगना आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानशिलात लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. कंगनाने कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संबंधित घटना ही दुपारी साडेतीनच्या सुमारास घटना घडली. कंगनाला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. सीआयएसएची महिला जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणीदरम्यान हे कृत्य केले. यानंतर कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत कंगनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ती विमानाने दिल्लीला रवाना झाली आहे.