त्या वादग्रस्त सचिवाने अखेर दिला राजीनामा ?
सातारा (महेश पवार) :
पीककर्ज” ह्या अनुदानित योजनेचा गैरफायदा घेत डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनचे सचिव बजरंग केंजळे यांनी स्वतः त्यांच्या गावच्या कठापूर विकास सेवा सोसायटी व कोरेगाव तालुक्यातील स्टेट बँक यामार्फत एकाच क्षेत्रावर, एकाच पिकावर दोन ठिकाणाहून सलग 4 वर्षे पीककर्ज घेतले. स्वतः सचिव असून, सर्व नियम माहिती असणाऱ्या सचिवाने हे कृत्य करणे अपेक्षित नव्हते, याबद्दल डिस्ट्रिक्ट सुपर व्हिजनच्या प्रशासनाने, जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी प्राथमिक निलंबनाची कार्यवाही घेतली होती.
सदर प्रकरणात कण्हेरखेडं गावचे तक्रारदार किशोर शिंदे यांनी सहकार प्रशासन, मुख्यमंत्री कार्यालय तसेच अनेक यंत्रणांना तक्रारी सादर केल्यावर, राजकीय दबावामुळे झालेली दिरंगाई व अनेक बाबींच्या तपासणीनंतर बजरंग केंजळे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली खरी, पण काही महिन्यातच त्यांना कण्हेरखेड ऐवजी एकंबे गावात पुन्हा सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली, 2 महिने त्यांनी ते कामही पाहिलं, धक्कादायक बाब म्हणजे बजरंग केंजळे पप्रकरणाची संपूर्ण फाईल ही किशोर शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधक व केडर यांना मागितली असता, एकंबे गावात कार्यरत असलेला बजरंग केंजळे अजूनही निलंबित असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कळवले व तो रिपोर्ट CBI कार्यालयास कळवल्याची प्रतही देण्यात आली. हा संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक असल्यामुळे बजरंग केंजळे एकंबे गावात कार्यरत असल्याचे पुरावे देतं जिल्हा उपनिबंधक व सहकार प्रशासनाला जाब विचारण्यात आला. जिल्हा उपनिबंधक याबाबतीत कोणताही खुलासा करू शकलं नाही.
ह्या प्रकरणाची चौकशी चालू असताना, बजरंग केंजळे याने आजारपण व इतर कारणातून दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर शिंदे यांच्या मते बजरंग केंजळे हा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनचा वाझे” असून,गेल्या अनेक वर्षात बहुसंख्य सचिवांनी हा प्रकार नेमणूक केलेल्या गावात केले असल्याचे नाकारता येणार नाही. ज्या कण्हेरखेडं गावात बजरंग याने 20 वर्षे सेवा दिली तिथे मोठया प्रमाणात दुबार पिककर्ज झाल्याची कबुली स्थानिक व सरपंच यांच्यामार्फत देण्यात आली आहे. बजरंग केंजळे याने राजीनामा दिला असला तरी सर्व विकास सेवा सोसायटी सचिव, जिल्हा बँक व इतर पीककर्ज वाटप करणाऱ्या जिल्ह्यातील संस्थांची चौकशी करण्यासाठी यंत्रणेला मागणी करणार असल्याचे किशोर शिंदे यांनी नमूद केले.