रोजगार मेळाव्याच्या फलिताविषयी पालकमंत्र्यांना शंका
सातारा (महेश पवार) :
सातारा येथे मोठा गाजावाजा करीत होत असलेल्या रोजगार मेळाव्याच्या फलिताविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच शंका उपस्थित केली आहे. रोजगार मेळाव्याचा केवळ इव्हेंट होऊ देऊ नका, किमान काही लोकांना तरी रोजगार द्या अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने व खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात दि. २१ रोजी महा रोजगार मेळावा होत आहे. मेळावा उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी तेथील इव्हेंट स्वरूपाचा डामडौल पाहून मेळाव्याच्या फलिताविषयी शंका उपस्थित करून मेळाव्याचा केवळ इव्हेंट करू नका अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान या महारोजगार मेळाव्यात एक हजार लोकांना रोजगार दिला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगताच बघूया ना असे म्हणत मंत्री शंभूराजेंनी ‘वेट अँन्ड वॉच’ची भूमिका घेतली.