सातारा
‘साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी आयलँडचा ‘बालहट्ट’ सोडावा’
सातारा (महेश पवार) :
साताऱ्यातील पोवई नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा आयलँड उभा करण्यात येणार असून या आयलँड ला सातारकर जनतेचा आणि शिवप्रेमींचा विरोध वाढला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बालहट्ट सोडावा अशी मागणी नागरिकांनी करत हातात बॅनर घेत निषेध केलाय.. शिवतीर्थ परिसरात अन्य कोणाचाही आयलँड नकोय अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देत एक इंचही जागा आयलँडसाठी आम्ही शिवभक्त देणार नाही अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.