google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या पार्टे हिल रिसॉर्टवर कारवाई नाहीच?

सातारा :

तालुक्यातील वर्ल्ड हेरिटेज दर्जा असलेल्या पठारावरील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई चा विषय चर्चेत असतांनाच पार्टे हिल रिसॉर्टवर पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन मुलींना ताब्यात घेतलं व एका युवकाला अटक करून त्याला कोर्टात हजर केलं , यावेळी कोर्टाने त्या युवकाला २९ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर त्या दोन मुलींना महिला वसतिगृहात पाठवण्यात आले. परंतु ज्यावेळी सातारा पोलिसांनी ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या पार्टे हिल रिसॉर्टवर का ? कारवाई केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे . यामुळे सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही तडजोड केली की काय?अशी सातार्यात जोरदार चर्चा सुरू आहे

कास पठारावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक युवक युवतींची याठिकाणी फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे , विशेष बाब म्हणजे अनेक हॉटेल्स मध्ये रजिस्टर नसून असलं तरी ते नावालाच ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून , अवैध धंद्यासाठी याठिकाणी ताशी पाचशे रुपये दरांची चर्चा असून अनेक हॉटेल्स मध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. यामुळे पोलीस दलाचे निर्भया पथक नेमकं काय करतं ?
कॉल गर्ल पुरविणार्या एजन्ट चे नेटवर्क शोधून काढण्याचं आव्हान सातारा पोलीसाच्या समोर उभं ठाकले आहे., सातारा शहर , राष्ट्रीय महामार्ग वर तसेच एम आय डी सी परिसरात असलेल्या लॉजिंगला मुलीं पुरविणारी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता कास येथील कारवाई वरून असण्याची शक्यता नाकारता येत नाही, जरी असे असले तरी मानवी देह विक्री व्यवसायात मुलींना,महिलांना जबरदस्ती ढकलून त्यावर स्वतःची आर्थिक उन्नतीकरणाऱ्या पांढऱपेक्षा समाजातील बड्या धेंडाना गजाआड करून यातील समूळ रॅकेटचा पडदा फाश करणं काळाची गरज बनली आहे. असह्य मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेत वेळ प्रसंगी पैशाचे आमिष,चंगळवादी जगण्याचा हव्यास या व्यवसायात खेचतो अशी सूत्रांकडून माहिती समजते मात्र यात मुलींची महिलांची फसवणूक ठरलेली असतेच., त्यामुळे याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी राजधानी साताऱ्यात होऊ लागली आहे.


कॉल गर्ल पुरविणार्या एजन्टचे नेटवर्क शोधून काढण्याचं आव्हान सातारा पोलीसाच्या समोर उभं ठाकले आहे., सातारा शहर , राष्ट्रीय महामार्ग वर तसेच एम आय डी सी परिसरात असलेल्या लॉजिंगला मुलीं पुरविणारी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता कास येथील कारवाई वरून असण्याची शक्यता नाकारता येत नाही, जरी असे असले तरी मानवी देह विक्री व्यवसायात मुलींना,महिलांना जबरदस्ती ढकलून त्यावर स्वतःची आर्थिक उन्नतीकरणाऱ्या पांढऱपेक्षा समाजातील बड्या धेंडाना गजाआड करून यातील समूळ रॅकेटचा पडदा फाश करणं काळाची गरज बनली आहे. असह्य मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेत वेळ प्रसंगी पैशाचे आमिष,चंगळवादी जगण्याचा हव्यास या व्यवसायात खेचतो अशी सूत्रांकडून माहिती समजते मात्र यात मुलींची महिलांची फसवणूक ठरलेली असतेच., त्यामुळे याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी राजधानी साताऱ्यात होऊ लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!