‘हा’ आहे देशातील पहिला ‘रेडी-टू मिक्स बॉडीवॉश’
मुंबई :
‘पूटिंग प्लॅनेट बिफोर प्रॉफिट्स’ या मूल्याच्या अनुषंगाने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने फक्त ४५ रुपयांना असलेल्या गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारतातील पहिल्या रेडी-टू मिक्स बॉडीवॉश चे अनावरण केले. ही नवकल्पना पुनर्वापराच्या आणि अपव्यय कमी करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांसाठी शाश्वत निवड करण्यास सक्षम करते.
अभिनेता शाहरुख खानला गोदरेज मॅजिक बॉडीवॉशचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि तो जनजागृती मोहिमेत सहभागी होणार आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉश त्याच्या रेडीटू-मिक्स फॉरमॅटसह, पर्यावरणविषयक समस्या तसेच ग्राहकांच्या आव्हानांसाठी एक उपाय आहे.
भारतात दरवर्षी ३.५ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्वचा आणि शरीर निगा उत्पादनांमध्ये उच्च पाणी सामग्री असते; परिणामी, उत्पादनापूर्वी कित्येक टन पाणी पाठवले जाते आणि ते वाहतूक करताना तयार झालेले उत्पादन जड बनवते. गोदरेज मॅजिक बॉडीवॉशला पॅकेजिंगमध्ये फक्त १६% प्लास्टिक आणि नियमित बॉडीवॉशच्या तुलनेत फक्त १९% ऊर्जा आणि साबण बार बनवण्यासाठी लागणाऱ्या एकूण उर्जेपैकी फक्त १०% ऊर्जा लागते. जेल-आधारित पिशवी लहान आणि हलकी असल्याने प्रत्येक ट्रकमध्ये अधिक सॅशेची वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे डिझेलचा वापर ४४% कमी होतो परिणामी नियमित बॉडीवॉशच्या वाहतुकीच्या तुलनेत ४४% कमी कार्बन उत्सर्जन होते.
या सादरीकरणाप्रसंगी बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले, “शाश्वतता ही आमच्या रणनीतीचा गाभा आहे. असे करताना आम्ही सर्वांना परवडणाऱ्या योग्य किंमतींवर अप्रतिम दर्जेदार उत्पादने बनवण्यासाठी बांधील आहोत. २०१८ मध्ये सादर करण्यात आलेला आमचा पावडर-टू-लिक्विड हँडवॉश हे आम्ही प्लास्टिक, पाण्याचा वापर आणि वाहतूक खर्च कसा कमी केला याचे उत्तम उदाहरण आहे. नवीन गोदरेज मॅजिक बॉडीवॉश फक्त ४५ रुपयांमध्ये सादर करत आम्ही ग्राहकांना साबणाप्रमाणे वाजवी किंमतीत बॉडीवॉश सादर करत आहोत. त्याच वेळी हे उत्पादन खिशाला परवडणारे आणि पर्यावरण पूरक आहे याची खात्री केलेली आहे. गोदरेज मॅजिक बॉडीवॉशचा चेहरा म्हणून शाहरुख खानच्या नावाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही प्लास्टिक, कार्बन फूटप्रिंट विषयी जागरूकता निर्माण करणे आणि बॉडीवॉशच्या माध्यमातून आंघोळीच्या वेळी साबण वापरणाऱ्यांचा अनुभव अधिक समृद्ध करणे यासाठी या उत्पादनाकरता सेलिब्रिटीना सामावून घेतले आहे.”