‘श्रेयवादाची टिमकी वाजवण्याचा काही जणांचा प्रयत्न’
खासदार उदयनराजे भोसले यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना टोला
सातारा (महेश पवार) :
नगर विकास विभागाने नगरोत्थान अंतर्गत 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी सातारा शहरासाठी मंजूर केला आहे या निधीवरून सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचा श्रेयवाद सुरू झाल्याचे पत्रकावरून स्पष्ट झाले असे निधी मंजूर होताच नेहमीच्या श्रेय घेण्याच्या सवयीची टीमकी वाजवण्याचा प्रयत्न काही जणांचा असल्याचा जोरदार टोला खासदार उदयनराजे यांनी कोणाचे नाव न घेता लगावला आहे
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की सातारा शहरासाठी 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झाला असून त्यामधून नऊ कामे सुचवण्यात आली आहे .यामध्ये हॉटेल अजिंठा चौक येथे उड्डाणपुलाच्या खाली जागा विकसित करणे एक कोटी 87 लाख अजिंक्यतारा किल्ला रस्ता विकसित करणे तीन कोटी 45 लाख प्रभाग क्रमांक 14 येथे नाल्याजवळ रिटर्निंग बॉल बांधणे 17 लाख बगाडे हॉस्पिटल ते टोपे मामा दत्त मंदिराखेर रस्ता डांबरीकरण करणे एक कोटी 99 लाख यादव गोपाळ पेठ येथे पाटील दवाखाना ते बोगदा रस्ता डांबरीकरण करणे 50 लाख साई बाबा मंदिर ते कल्याणी शाळा रस्त्यावर बॉक्स कल्चर पुलाचे बांधकाम करणे 76 लाख सातारा शहराच्या पश्चिम भागातील रस्ते दुरुस्ती 76 लाख 40 हजार सातारा शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे 52 लाख प्रताप सिंह महाराज उर्फ दादा महाराज चौक बॉम्बे रेस्टॉरंट ते मंगलमूर्ती रेसिडेन्सी अपार्टमेंट अखेर गटर करणे एक कोटी साठ लाख ही कामे करण्यात येणार आहेत या कामांच्या निविदा 9 जानेवारी रोजी काढण्यात आले आहेत निकषानुसार पात्र निविदाधारकांना कामाच्या वर ऑर्डर दिल्या जातील ती कामे दर्जेदार करून घेण्यावर सातारा विकास आघाडीचे निश्चित लक्ष राहील नियोजन समितीतून वरील मंजूर कामाव्यतिरिक्त आणखी काही विकास कामांचे प्रस्ताव सातारा विकास आघाडीने दिले आहेत बॉम्बे रेस्टॉरंट आणि खेड येथील उड्डाणपुलाखाली जागेचे सुशोभीकरण यामध्येही लोकांच्या हिताच्या कामाचा समावेश आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे या कामांना लवकरात निधी मिळेल असा विश्वास आहे मात्र काही लोकांना श्रेय घेण्याचा खटाटोप असतो त्यांनी त्यांच्या सवयीची टीमकी वाजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा टोला उदयनराजे यांनी कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे लगावला
नगरोत्थानच्या निधी संदर्भात सुरुची आणि जलमंदिर या दोन साताऱ्यातील पारंपारिक सत्ता केंद्रावरून वेगवेगळ्या प्रसिद्धी पत्रकांमुळे दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये पुरता श्रेयवाद सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे